एका उमरावाची तरूण पत्नी परपुरूषाबरोबर प्रणय करताना तो पहातो. भांडण, मारहाण काहीही न करता किंवा प्रत्यक्ष घटस्फोट न घेता, ते दोघं विभक्त होतात. पुढचं एक वर्ष उमराव प्रवास करत फिरत राहतो. त्याच्या कानावर तिच्याबदद्ल काहीही वेडंवाकडं पडत नाही. पण असाच रेव्बे प्रवास करत असताना काही वर्षांनी त्याला ती अपघातानेच भेटते.