एका स्त्रीचं एका पुरूषावर मनस्वी प्रेम असतं ! हे प्रेम तो काहीही कारण नसताना अव्हेरतो. त्याच्यापासून तीला दिवस गेलेले असतात. प्रेमभंग झालेली ती तरूण लग्न करते तेव्हा आपल्या पतीला मूल दुस-या पुरूषापासून होणार असल्याची स्पष्ट कल्पना देते. आधीच्या मित्राला मात्र काहीच कल्पना नसते. तो अविवाहीत राहतो. काही वर्षांनंतर त्याला आपली जुनी मैत्रिण अचानक भेटते. तिच्यासह तीचा दहा वर्षांचा मुलगाही आहे. तिला भेटण्याचा, बोलण्याचा प्रयत्न तो करतो तेव्हा त्याच्या लक्षात येते की हा मुलगा आपलाच आहे. हे सत्य समजल्यावर तो काय करेल ?