एकोणीस आणि विसाव्या शतकातल्या जागतिक कीर्तीच्या हस्तरेषातज्ञ कीरोला भूताखेतांचे अनेक विलक्षण अनुभव आलेले होते. त्यापैकी काही त्याने कथारूपात लिहून ठेवले आहेत. या चित्तथरारक कथेतील माणसाने आपल्या मृत्यूनंतर आपल्या बायकोने आपल्या मित्राशी ठेवलेल्या संबंधांचा बदला कसा घेतला याची कहाणी आहे मग तुम्ही त्यावर विश्वास ठेवा किंवा नका ठेऊ.