एखाद्या व्यक्तीचे पोर्टेट त्याला समोर बसवून काढले जाते. त्यासाठी काही दिवस बैठक करावी लागते. परंतु, कधीकाळी एक- दोनदा थोडा वेळ नुसती भेट झालेल्या व्यक्तीचे चित्र केवळ आठवणीतून काढणे शक्य आहे का ? एका चित्रकारावर तसे करण्याची वेळ येते आणि प्रत्यक्षात ती व्यक्ती जिवंत नसून मरण पावलेली असते. असे अनुभव क्वचितच कुणाला येत असतील.