एका कमकूवत ह्रदयाच्या स्त्रीला तिचा नवरा गेल्याची बातमी अतिशय हळुवारपणे काळजीपूर्वक सांगितली जाते. तो धक्का संयमाने पचवून ती पुढील जीवनाचा, एक प्रकारे स्वातंत्र्याचा विचार करू लागते. त्याप्रमाणे चित्रे तिच्या नजरेसमोर तरळू लागतात आणि अचानक तिचा नवराच तिच्या घरी परत येतो. नातलग आणि मित्रांना अत्यानंद होतो पण आता बायकोची अवस्था काय होणार ?