वरिष्ठ पोलीस अधिकारी असलेल्या पतीवर तिचे मनापासून प्रेम आहे. त्यातून तीला दिवस गेलेले. रोज संध्याकाळी तिची ती आतुरतेने वाट पहाते. आजही तो वेळेवर येतो. पण त्याची मनःस्थिती नेहमीसारखी प्रसन्न नाही. त्याबद्दल ती विचारपूस करते. त्यावर तो जे काही बोलतो ते अत्यंत धक्कादायक आहे. वरकरणी ती शांत दिसते पण आतून ती ज्वालामूखीसारखी धगधगत आहे. ती आता काय करणार आणि परिणिती कशात होणार?