भेळेचा व्यवसाय एखाद्याला हातावर पोट असलेला भेळवाला ते करोडपती भेळवाला इतकं मोठं करू शकतो. उदरनिर्वाहासाठी चार पैसे मिळवण्यासाठी आईने सुरू केलेल्या या व्यवसायाचं स्वरुप कल्याण भेळेच्या मालकांनी आमूलाग्र बदलून टाकलं आहे. दशदिशांनी वाढणाऱ्या पुण्यातील खवय्यांनी आपल्या पसंतीचा शिक्का कल्याण भेळेवर ठळकपणे उमटवला आहेच, पण परदेशात राहणाऱ्या मराठी मंडळींनी देखील या भेळेला आपलंसं केलेलं आहे. हातगाडीपासून सुरू झालेला, कल्याण भेळेचा प्रवास असा आता सातासमुद्रापार गेलेला आहे. त्या लज्जतदार प्रवासाची ही चविष्ट कहाणी...