चितळे बाकरवडीचं नाव घरोघरी पोहोचलं आहे. चितळे खाद्य उत्पादनांच्या चवींनी आता राज्या-देशाच्याही सीमा ओलांडल्या आहेत. हा व्यवसाय आणखी विस्तारण्याचं स्पप्न उराशी बाळगणारे श्रीकृष्ण चितळे गेली अनेक वर्ष सचोटी, पारदर्शकतेच्या बळावर या व्यवसायात यशस्वी ठरले आहेत. त्यांच्या या यशस्वितेची गोष्ट आणि त्यांनी पाहिलेली आणखी मोठी स्वप्नं ऐकायलाच हवीत, इतकी प्रेरणादायी आहेत. 'ऐका चितळे नावाची चव आणखी विस्तारायची आहे' मिलिंद कुलकर्णी यांच्यासह.