शिवण्याच्या मशीनचा शोध लागल्यानंतर जगात ख-या अर्थाने वस्त्र क्रांती झाली. अन्न, वस्त्र, निवारा या माणसाच्या मूलभूत गरजा मानल्या जातात. यातील वस्त्राची गरज शिवणयंत्राशिवाय भागणे शक्यच नव्हते. जगातल्या सर्व देशांमध्ये सातत्याने चालणारा व्यवसाय हा शिवणाचा आहे. या व्यवसायाचा जनक सिंगर याने हा व्यवसाय जगभर कसा पोहचवला याची ही कहाणी...