भारतातल्या लाखो गरीब कुटुंबांची इंधनासाठी वापरत असलेल्या साधनांच्या धूळ-धुरापासून सुटका व्हावी म्हणून त्यांना एलपीजी गॅस जोडणी पुरवठ्यासाठी 2016 मध्ये केंद्र सरकारने प्रधानमंत्री उज्वला योजना सुरु केली. हा वाचलेला वेळ आणि ऊर्जा स्त्रियांनी इतरत्र वापरून स्वत:ची प्रगती करावी हा यामागचा हेतू. याचबरोबर पर्यावरणाचाही महत्वपूर्ण विचार यामागे होता. अशाच विचारांनी प्रेरित झालेल्या आणि त्यासाठी अबुधाबीची भरभक्कम पगाराची नोकरी सोडून भारतात उद्योग उभ्या करणाऱ्या विजय माने यांची ही कहाणी...