लग्न म्हणलं की पारंपरिक पद्धतीचे विधी, मंगल-कार्यालयं, पत्रावळ्यांवरचं सुग्रास भोजन हे चित्र जाऊन त्याचं रुप आता वेडिंग इवेंट्सनी घेतलं आहे. वेडिंग प्लॅनर्सना बोलावून हवा तसा लग्नसोहळा करवून घेणं ही काही आता सेलिब्रिटी वा श्रीमंतांची मक्तेदारी राहिली नसून अनेक सामान्यांचाही आता अशा प्रकारच्या लग्नसोहळ्याकडे कल आहे. या क्षेत्रातल्या संधी पाहून, अथक मेहनतीने लग्नसोहळा देखणा करणाऱ्या अशाच एका उद्योजकाची ही यशोगाथा.