तंत्रज्ञानाचा वापर मूठभर सुखवस्तू लोकांसाठी नाही तर सर्वसामान्य लोकांकरता झाला तर त्यातून सर्वांचंच आयुष्य सुखकर होणार आहे. हीच गोष्ट लक्षात घेऊन आदित्य इंगळहळीकर यांनी पाठीच्या दुखण्यापासून आराम देणारी उपकरणं, तंत्रज्ञान विकसित केलं, लोकांकरता ते उपलब्ध करून दिलं. त्याचीच गोष्ट आता आपण ऐकणार आहोत.