लग्नाचा बस्ता म्हंटलं की पुर्वी घरातली जुनी-जाणती मंडळी विविध दुकानांत, कपड्यांच्या होलसेल दुकानांत खरेदीला जायची. पन्नास तरी दुकानं या बस्त्यासाठी पालथी घालायची. आहेराचे कपडे वेगळे, नवरा-नवरीचा पोशाख वेगळा...यासाठी खूप धावपळ व्हायची. पण हे सारं एकाच 'मांडवाखाली' आणि विशेषत: नवरा-नवरीच्या स्पेशल पोशाखाकरता आज एक नाव सुप्रसिद्ध आहे - 'C'lai' अनेकमजली अशा या भव्य दुकानात लग्न वा इतर कोणत्याही समारंभाकरता शेकडो प्रकारचे पारंपरिक पोशाख मिळतात. या दुकानाला लोकांची खूप पसंती मिळते. असं काय खास आहे या दुकानात...आणि या उद्योगाची जन्मकहाणी ऐकुया यशस्वी उद्योजकच्या या भागात.