उच्च शिक्षण, तंत्रज्ञानात नवनवीन प्रयोग करून पाहण्याची उर्मी, सतत नव्या उत्पादनांचा ध्यास आणि मायभूमीशी घट्ट जुळलेली नाळ या चारही गोष्टींचा संगम म्हणजे डॉ. रविंद्र कुलकर्णी या उद्योजगाचं व्यक्तिमत्व आहे. जातिवंत उद्योजकांची सगळी लक्षणं त्यांच्यात आहेत. म्हणून केवळ एकाच उत्पादनावर संतुष्ट न राहता ते नवनवीन उत्पादनं बनवत राहतात, अमेरिकेतलं सुखासीन आयुष्य सोडून भारतात नवी आव्हानं पेलायला सिद्ध होतात.