एड्स हा रोग प्राणघातक तर खराच. पण प्रसिद्धी माध्यमांनी याला अतोनात प्रसिद्धी दिली. यामुळे लोकांचे समज -गैर समज व्हायलाही सुरुवात झाली. थेंब थेंब मृत्यू हि एक एड्स या रोगाशी एका भारतीय शास्त्रज्ञाने दिलेल्या झुंजाची कहाणी नव्हे तर ती भारतीय शास्त्रज्ञांना विद्यापीठांकडून मिळणाऱ्या मानहानीचे विदारक दर्शन घडवणारी कथा आहे. हि कादंबरी मानवी मनाची गुंतागुंत प्रभावीपणे मांडते.