शिक्षकच नव्हे, तर पालक आणि विद्यार्थ्यांनाही शिक्षणाबद्दलचा व्यापक दृष्टिकोन देणारे हे पुस्तक शिक्षण म्हणजे काय, यावर मूलगामी व अभिनव चिंतन करते.
शैक्षणिक मानसशास्त्र, सामाजिक मानसशास्त्राचा शिक्षणावरील परिणाम आणि ज्ञान म्हणजे काय, यावर या पुस्तकात मूलगामी विचार केलेला आहे. भविष्यातील शिक्षण पद्धती कशी असावी याचेही दिशा दिग्दर्शन या पुस्तकातून होते.
भविष्यातील समाजरचना आणि आज दिल्या जाणाऱ्या शिक्षणाचे एकुणातील परिणाम यावर व्यापक चर्चा करत शिक्षणाचा मग नेमका उद्देशच काय असला पाहिजे, यावरचे चिंतन या पुस्तकात आले आहे.
प्रत्येकाने वाचावे आणि बोध घ्यावा असे हे क्रांतिकारी पुस्तक !