खरंच.... तो रोगट सुरेंद्र अधिकारी मेला... काय होईल? वाईट काहीच नाही! रोगट शरीरापासून त्याची सुटका होईल. संमोहिनी त्याच्या बंधनातून मुक्त होईल. आपलं आयुष्य मार्गी लागेल! मग सुरेंद्र का मरणार नाही? आपण स्वत: कुठेही न अडकता, संमोहिनीला संशय येऊ न देता, सुरेंद्र अधिकारी हा 'वृद्ध तरुण' मरू शकतो का? याचाच दुसरा अर्थ असा संमोहिनी कायमसाठी आपली होऊ शकते! हे फार महत्त्वाचं. कोणाला, खुद्द सुरेंद्र नि संमोहिनीलाही माझा संशय येणार नाही, अशा पद्धतीनं सुरेंद्र मरेल का? जाणून घ्या सुरेंद्र मरणार की अजून काही विपरीत होणार..? सु.शिं.ची वेगवान भन्नाट थरार कथा... ऐका- ' ज्याचं त्याचं...'.