शंकर पुजारी... एक चांगले लेखक... त्यांच्यावर सरस्वतीने जणू वरदहस्त ठेवला आहे... चिंतनशील... विचारवंत व्यक्तिमत्त्व... दुसरीकडे, जयराम देसाई... शंकररावांच्या तुलनेत एकदम डावे लेखक... पण रुबाब एकदम भारदस्त... व्यक्तिमत्त्व समोरच्यावर छाप पाडणारे... शोमनशिपचे पुरेपूर गुण... आणि या दोघांमध्ये आहे चुरशीची लढत... मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीची... तर कोण करणार कोणावर कुरघोडी... अध्यक्षपदाची माळ कोणाच्या गळ्यात पडणार? जाणून घ्या हे रहस्य सु.शिं.च्या उत्कंठापूर्ण कथेत- 'एका अध्यक्षपदाची गोष्ट'.