दैनंदिन वापराच्या बहुराष्ट्रीय कंपन्यांनी उत्पादित केलेल्या वस्तू सर्वसामान्य ग्राहकाच्या आवाक्यात नसतात, पण त्या वापरण्याला पर्यायही नसतो. गेल्या काही वर्षात पतंजली या ब्रँडने अस्सल भारतीय बनावटीच्या अशा अनेक वस्तुंचं उत्पादन सुरू केलं आणि रास्त किंमतीत त्याची विक्री केली. त्याचा फार मोठा फटका या कंपन्याना बसला आहे. गुणवत्तेशी तडजोड न करता ग्राहकांना परवडणाऱ्या दरात उत्पादनं विकणं किती फायद्याचं ठरू शकतं, हे जवळपास पन्नास वर्षापुर्वी एका द्रष्ट्या उद्योजकानं ओळखलं आणि त्यातून निर्माण झाला 'निरमा'सारखा तगडा ब्रँड. सबकी पसंद बनलेल्या निरमाची ही रंजक आणि प्रेरक कहाणी!