कोणत्याही अपंग व्यक्तीकडे पाहण्याचा समाजाचा विशिष्ट दृष्टीकोन असतो. अपंग व्यक्ती कधीच स्वावलंबी बनू शकणार नाही, हे गृहीत धरून त्यांच्याकडे सहानुभूतीने पाहिलं जातं. पण डोंबिवलीचे राजीव केळकर मात्र याला अपवाद आहेत. अपंगांना रोजगार आणि स्वयंमरोजगाराच्या विविध संधी मिळवून देण्यासाठी ते सर्वतोपरी प्रयत्न करतात. अशाच त्यांच्या प्रयत्नाविषयी सांगत आहेत मिलिंद कुलकर्णी. ऐका, 'उद्योग अपंगांच्या हिताचा...'