भारताविरुद्ध आंतरराष्ट्रीय कारस्थाने वाढू लागली आणि त्यातच भारतीय पंतप्रधानांची हत्या झाली. देशात हल्लकल्लोळ उडाला. तेवढ्यात पंतप्रधानांच्या एका डमीचा अपघाती मृत्यूही झाला. इन्शुरन्स कंपनीतर्फे एका खाजगी गुप्तहेराने डमीच्या पोस्टमोर्टेम रिपोर्टचा अभ्यास केला आणि धक्कादायक बाबी समोर येऊ लागल्या आणि संशयाचे जाळे निर्माण होऊ लागले. मग सुरु झाला एक शोध.... काय झाले होते नेमके? पंतप्रधानांची खरेच हत्या झाली होती की तो एक बनाव होता? पंतप्रधान जिवंत असतील तर ते आता कोठे होते? हे चक्रावून टाकणारे रहस्य नेमके काय होते? अवश्य ऐका एक हादरवून सोडणारी कथा...