प्रस्तुत कादंबरीमध्ये डॉ. एस.एल. भैरप्पा यांनी आठव्या शतकाची पार्श्वभूमी निवडली आहे. वैयक्तिक कारणासाठी नागभट्ट गावाबाहेर पडतो आणि एका सार्थामध्ये सहभागी होऊन प्रवास करू लागतो. त्या निमित्ताने त्या काळाचा भारतवर्ष अनेक सामाजिक, धार्मिक प्रश्न घेऊन त्याच्या सामोरे येतात. अनेक धर्म आणि पंथातले मतभेदही त्याच्या सामोरे येतात. काही त्याच्या प्रश्नांची उकल करतात तर काही नवे प्रश्न निर्माण करतात. स्त्री - पुरूष संबंधालाही वेगळेच परिमाण लाभल्याचा अनुभव तो घेतो. आठव्या शतकातील ऐतिहासिक संदर्भ घेत ही कादंबरी लिहिली गेली आहे. मानवी स्वभावाचे अनेक पैलू उलगडणारी ही कथा "सार्थ "म्हणूनच ऐकत राहावा असा अनुभव देते....
काल्पनिक कहानियां और साहित्य