नोकरी करणारा एक तरूण आपल्या वडिलांसह घरात राहतो आहे. त्यांच्याशी मोजकेच संभाषण आहे. बाहरेच्या लोकांनी त्यांची चौकशी केली की, त्यांचे वय आणि प्रकृतीविषयी माहिती देणे हे त्याचे काम. एक दिवस वडील मरण पावतात. संशयाचे वातावरण तयार होते. त्यांच्या संपत्तीसाठी मुलाने त्यांना मारले अशी चर्चा सुरू होते. पोलिसांच्या चौकशीत तो निर्दोष ठरतो. एक दिवस दूरच्या गावी राहणारे त्याचे खऱे वडील घरी हजर होतात, आता पुढे काय होणार?