चेतन केतकर यांचं नेमकं वर्णन करायचं तर 'काळापुढती दोन पावले' अशा शब्दांत करावं लागेल. गणेशमूर्तींचा म्हणजे परंपरेने चालत आलेला व्यवसाय ते करतात पण तो करताना सध्याच्या काळापुढे उभं असलेलं पर्यावरणहानीचं संकट ओळखून पर्यावरणस्नेही गणेशमूर्ती बनवतात शिवाय त्याची ऑनलाईन विक्रीही! काळाशी सुसंगत उद्योजकता करणाऱ्या उद्योजकाची ही कहाणी!