स्वातंत्र्यानंतर भारतात लढाऊ विमानं तयार करणारी एकच कंपनी होती, हिंदुस्तान एरॉनॉटिकल्स अर्थात हि.ए. या कंपनीवर हलक्या लढाऊ विमानांच्या निर्मितीची जबाबदारी टाकण्यात आली. हरि नारायण यांच्यावर ही जबाबदारी येऊन पडली. तत्कालीन भारतात फार विकसित तंत्रज्ञान नव्हतं, अशा परिस्थितीत अमोल यादव या मुंबईच्या तरुणानं हाती काही नसताना, कोणतंही पाठबळ नसताना नव्या विमानाचं प्रारुप कसं बनवलं हे पाहणं कौतुकास्पद आहे.