YAYATI

· MEHTA PUBLISHING HOUSE
4.0
810条评价
电子书
432
评分和评价未经验证  了解详情

关于此电子书

Yayati is the story of the lust of a king by the same name, who appears in the Mahabharata, one of the two epics of India.  Though married to beautiful Devyani, he found the female servant, Sharmishtha, enticing. He had five children from these women but his desire for pleasure remained unsatisfied.  Did his quest for the carnal end with his exchanging his old age with his son’s youth? How long did he enjoy the sensual pleasures?
Yayati stands for one who is never satisfied with earthly pleasures. Though the story of  the ancient times centers only around dissolute desires of an individual, one can draw parallel examples from the present days of consumerism where the insatiability to have more pleasures continues.
Vishnu Sakharam Khandekar (1900-1900) was a prolific writer. Winner of the coveted Jnanpeetha  Award which may be compared to being the Noble Prize for Literature in India, Khandekar made his mark in Marathi literature through his novels, short stories, essays, critiques. He played an important role in Marathi filmdom through his screenplays dialogues, and lyrics. He had won many accolades  in his long literary career.

कै. विष्णु सखाराम तथा भाऊसाहेब खांडेकर यांच्या एकूण साहित्यकृतींच्या रत्नमाळेतील ‘ययाति'चे स्थान मेरुमण्यासारखे आहे. या कादंबरीचा पुराणाशी केवळ नावापुरता संबंध नाही. एका प्रसिद्ध पौराणिक उपाख्यानाचे धागेदोरे घेऊन ते त्यांनी या कादंबरीत स्वतंत्र रीतीने गुंफले आहेत. आपल्या प्रतिभेची जात, तिची शक्ती आणि तिच्या मर्यादा यांची योग्य जाणीव झालेल्या खांडेकरांनी आत्माविष्काराला योग्य अशीच कथा निवडली. ती ज्या माध्यमातून त्यांना प्रगट व्हावीशी वाटली, त्याच्यावर त्यांचे प्रभुत्व होतेच. पुराणकथांत जे भव्य-भीषण संघर्ष आढळतात, त्यांचे मंथन करण्याची अंगभूत शक्तीही त्यांच्या चिंतनात होती. जीवन जसे एका दृष्टीने क्षणभंगुर आहे, तसेच ते दुसर्या दृष्टीने चिरंतन आहे; ते जितके भौतिक आहे, तितकेच आत्मिक आहे, या कठोर सत्याचे आकलनही त्यांना पूर्णत्वाने झालेले होते. त्यामुळेच एका पौराणिक कथेच्या आधाराने एक सर्वोत्तम ललितकृती कशी निर्माण करता येते, याचा आदर्श वस्तुपाठच ‘ययाति'च्या रूपाने श्री. खांडेकरांनी वाचकांपुढे ठेवला आहे. कामुक, लंपट, सप्नातही ज्याला संयम ठाऊक नाही, असा ययाति; अहंकारी, महत्त्वाकांक्षी; मनात दंश धरणारी आणि प्रेमभंगाने अंतरंगात द्विधा झालेली देवयानी; स्वत:च्या सुखाच्यापलीकडे सहज पाहणारी आणि ययातिवर शरीरसुखाच्या, वासनातृप्तीच्या पलीकडच्या प्रेमाचा वर्षाव करणारी शर्मिष्ठा आणि निरपेक्ष प्रेम हाच ज्याचा स्वभावधर्म होऊन बसला आहे, असा विचारी, संयमी व ध्येयवादी कच या चार प्रमुख पात्रांमधील परस्परप्रेमाची विविध स्वरूपे या कादंबरीत समर्थपणे चित्रित झाली आहेत. ‘ही कादंबरी ययातीची कामकथा आहे, देवयानीची संसारकथा आहे. शर्मिष्ठेची प्रेमकथा आहे आणि कचाची भक्तिगाथा आहे, हे लक्षात घेऊन वाचकांनी ती वाचावी,' अशी अपेक्षा स्वत: खांडेकरांनीच प्रकटपणे व्यक्त केली आहे. 





评分和评价

4.0
810条评价

作者简介

 मराठी साहित्यक्षेत्रात वि.स. खांडेकर हे नाव आदराने उच्चारले जाते. विनोदी साहित्याने लेखनप्रारंभ करणाऱ्या खांडेकरांना कालांतराने थोर विचारवंत आणि समीक्षक म्हणून लोकप्रियता मिळाली. कथा, कादंबरी, काव्य, नाटक, निबंध, पटकथा, समीक्षा, विनोद, व्यक्तिचित्रे, अनुवाद अशा अनेक साहित्यप्रकारात त्यांनी विपुल लेखन केले. साहित्यक्षेत्रातील काही मोजक्या अजरामर कलाकृतींमध्ये त्यांच्या ‘ययाति’ आणि ‘अमृतवेल’ या कादंबऱ्यांची गणना होते. अनेक ग्रंथांचे त्यांनी संपादन केले. पत्रकारितेच्या क्षेत्रातही त्यांचे योगदान मोलाचे आाहे. त्यांच्या साहित्यकृती भारतातील अनेक भाषांत अनुवादित झाल्या आहेत.

त्यांच्या या साहित्यसेवेची नोंद घेऊन भारत सरकारने त्यांना १९६८ साली ‘पद्मभूषण’ पुरस्काराने गौरविले. १९७०मध्ये त्यांना साहित्य अकादमीने ‘महत्तर सदस्यत्व’ (फेलोशिप) बहाल केले. सन १९७६ साली सर्वोत्कृष्ट भारतीय साहित्यासाठी दिला जाणारा ‘ज्ञानपीठ’ पुरस्कार खांडेकरांना लाभला. कोल्हापूर येथील शिवाजी विद्यापीठाने त्यांना डी.लिट. पदवी बहाल केली. सन १९७४ सालासाठीचा मराठीला लाभलेला पहिला ‘ज्ञानपीठ पुरस्कार’ खांडेकर यांच्या ‘ययाति’ कादंबरीला १९७६ साली बहाल करण्यात आला.

为此电子书评分

欢迎向我们提供反馈意见。

如何阅读

智能手机和平板电脑
只要安装 AndroidiPad/iPhone 版的 Google Play 图书应用,不仅应用内容会自动与您的账号同步,还能让您随时随地在线或离线阅览图书。
笔记本电脑和台式机
您可以使用计算机的网络浏览器聆听您在 Google Play 购买的有声读物。
电子阅读器和其他设备
如果要在 Kobo 电子阅读器等电子墨水屏设备上阅读,您需要下载一个文件,并将其传输到相应设备上。若要将文件传输到受支持的电子阅读器上,请按帮助中心内的详细说明操作。