मराठी साहित्यामध्ये लघुनिबंध हा साहित्यप्रकार रुजवण्यामध्ये वि.स.खांडेकर यांचे नाव अग्रगण्य आहे. त्यांनी विपुल प्रमाणात लघुनिबंध लिहिले असून त्याचा विकास केला आहे, नव्हे, ‘खांडेकरी शैलीचे लघुनिबंध’ असा एक प्रवाहच आता मराठी साहित्यात रूढ झाला आहे.खांडेकरांची शैली अभिजात तर आहे, त्यात नर्मविनोदाची पखरणही आहे, त्यात जीवनचिंतनाची सखोल डूबही आहे आणि जीवनप्रवासात लेखकाला आलेले अनुभव सांगण्याचे कौशल्यही आहे. ओघवती व संवाद साधल्यासारखी त्यांची भाषा वाचकाशी जवळीक साधून वाचक त्याच्याशी समरूप होतो.वरील वैशिष्ट्यांनी संपृक्त झालेल्या या संग्रहातले लघुनिबंधही वाचकांच्या मनाचा ठाव घेतील, नवे जीवनदर्शन घडवतील हे नक्की!