I was lucky to born on an island. I was born on the islands of Manhattan in New York. It was a small world. I was born here and was immensely in love with it. As I grew up I realized that this place belongs to me and I belong to it. Thereafter I never hesitated to move along anywhere in Manhattan. I roamed to please myself. I watched what I desired and wished. I enquired about the things I wanted to know about. Of course, while I was young I did not go far away. But as I grew in a real sense, I gathered courage. I started exploring it. I walked down through every lane of New York.जन्माला यावे, ते एखाद्या रम्य बेटावर. हे भाग्य मला लाभले. न्यूयॉर्कमधल्या ‘मॅनहटन’ या रम्य बेटावर माझा जन्म झाला. ‘मॅनहटन’ म्हणजे एक लहानसे जगच होते. अशा या जगात मी जन्माला आलो आणि अगदी सुरुवातीपासून त्याच्यावर माझा जीव जडला. कळू लागल्यापासून मला वाटू लागले की, हे गाव माझे आहे आणि मी या गावचा आहे. आणि मग या माझ्या गावात मोकळ्या अंगाने कुठेही हिंडायला मला कधी काही वाटले नाही. मन मानेल तसे भटकावे, पाहिजे ते बघावे, पाहिजे त्याची चौकशी करावी. अर्थात नाकळता होतो, तेव्हा मी फार लांब भटकत नव्हतो; पण लवकरच मी कळता झालो. धीट झालो आणि न्यूयॉर्कची गल्लीनगल्ली पालथी घातली.