घरात ज्येष्ठ नागरिक असलेले चांगले, असा मतप्रवाह दिसला तरी नोकरीसाठी बाहेर जावे लागते, तेव्हा त्यांना ठेवायचं कुठे हा प्रश्न निर्माण होतो. रेनबो डे केअर सेंटरच्या संचालिका अनुराधाताई करकरे यांनी ज्येष्ठांचे पाळणाघर सुरू करून तो प्रश्न तर काही अंशी सोडवला आहे पण त्याचबरोबर अर्थार्जनाचा एक नवा मार्गही दाखवून दिला आहे.