आपली संस्कृती नेहमी दमन करायला सांगते! शमनावर तिचा भर नाही. हे वाईट आहे. मनातल्या इच्छा पूर्ण उपभोगान्तीच नष्ट होतात. माणूस स्वच्छ मोकळा होऊन जातो. त्या दडपल्या-कृतीत आणल्या नाहीत, याचा अर्थ, त्या 'नाहीत असा होत नाही. मनाच्या सुप्त पातळीवर त्या वळवळत राहतात. त्या गुपचूपपणे पूर्ण करून घेण्याच्या हेतूनं मेंदू मार्ग शोधत राहतो, आणि ... यातूनच मग विकृतीचा जन्म होतो ! अशाच भारतीय संस्कृतीचा पाईक असणार्या मध्यमवर्गीय अप्पा मंडलीक याची कथा.. तो आपल्या इच्छांचे शमन करू शकेल की त्या सुद्धा मध्यमवर्गाच्या ओझ्याखाली दबल्या जातील? सु.शिं.च्या सामाजिक कथेतून... जरूर ऐका... 'शमन'.