'हुच्च काणे'... नावातच तिकडमबाजी असलेल्या व्यक्तीचे किस्सेही तेवढेच अफलातून, रहस्यकथा काढणे असो, किंवा प्रकाशन व्यवसायात जोरात उडी मारणे असो... एकावर एक गोष्ट फ्री... आणि नफेखोरीतून उद्भवणारे गोंधळ हे हुच्चच्या कारकिर्दीचे लक्षण... हुच्च पुढे जाऊन काय काय व्यवसाय चालू करतो, आणि त्यात किती स्कीम्स काढतो, हे एकदा ऐकून अनुभवणे आणि त्याची मौज जाणून घेणे अगदी मस्ट... ऐका सुहास शिरवळकर लिखित एका तिकडमबाजाची तिकडम कथा... 'लागण'