विश्वासघाताने पकडला गेलेल्या विठोजी होळकरला शनिवार वाड्यासमोर हत्तीच्या पायी देउन ठार मारण्यात आले. यशवंतराव गप्प बसणार नव्हते. त्यांनी पुण्यावर स्वारी केली. पेशवा आणि शिंदेंची बलाढ्य फौज पराजित झाली. पेशवा पळून गेला आणि इंग्रजांशी तह करुन बसला. यशवंतरावांनी गेली पाच वर्ष दौलतराव शिंदेच्या कैदेत असलेल्या आपल्या पत्नी आणि कन्येची सुटका केली. इंग्रज हेच भारतावरील खरे संकट आहे हे यशवंतरावांच्या लक्षात आले आणि त्यांनी आपली युद्धनीतिच बदलली! काय होती ती?