डुंडरनेकच्या सह पलटनी आणि नागो जिवाजीची पंधरा हजारांची फौज यशवंतरावांवर चालून आली. यशवंतरावांनी शितापीने चकवा देत आधी इंदोर गाठले आणि तेहे शहर मूक्त केले. ते आता उलटे फिरले ते महेश्वरला वेढा देऊन बसलेल्या दुष्मनावर! येथे एवढी कत्तल झाली की नर्मदेतून रक्त वाहतेय की पाणी हा प्रश्न पडावा!