'प्रतिपश्चंद्र' मराठीतील पहिली शिवकालीन ऐतिहासिक रहस्य कादंबरी... एक अद्भुत साहित्यकृती! छत्रपती शिवाजी महाराज आणि गुप्तहेरप्रमुख बहिर्जी नाईक यांनी अत्यंत गुप्त पद्धतीने लपविलेले रहस्य...एक असे रहस्य ज्याची सुरक्षा आजही महाराजांच्ये आठ शिलेदार जीवाची बाजी लावून करत आहेत. गेल्या साडेतीनशे वर्षांपासून अत्यंत गुप्त आणि गुढ पद्धतीने एक युद्ध या मातीत सुरू आहे. या युद्धात आजवर शेकडो लोकांनी एकमेकांच्ये जीव घेतले... जीव दिले आहेत. चौदावे शतक, सतरावे शतक आणि एकविसावे शतक या तीन कालखंडाना जोडणारी ऐतिहासिक थरार कादंबरी 'प्रतिपश्चंद्र'!. इतिहासावर प्रेम करणाऱ्याने ही कादंबरी वाचावी.
Skönlitteratur och litteratur