व्यापक व सखोल शिक्षणाच्या बाबतीत पालकांचे औदासिन्य ही शिक्षकांची सर्वात मोठी समस्या असण्याची शक्यता आहे. केवळ मुलांना योग्य प्रकारे शिक्षण देणे हे केवळ शिक्षकांचे काम नसून पालकांनी देखील तितक्याच आत्मीयतेने मुलांच्या शैक्षणिक आणि व्यक्तिगत विकासावर भर दिला पाहिजे . घर व शाळा दोन्ही मिळून शिक्षणाचे एक संयुक्त केंद्र बनले पाहिजे. त्यांची शिकवण ही केवळ पुस्तकी ज्ञानावर आणि सिद्धांतांवर आधारित नाही; आणि म्हणूनच जगातील सद्यकालीन आणीबाणीच्या परिस्थितीच्या संदर्भातील प्रश्नांची, तसेच मानवी अस्तित्वाशी निगडित चिरंतन प्रश्नांची उत्तरे ज्या व्यक्ती शोधत असतात, त्या सर्व प्रश्नांची उत्तरे आपल्याला या पुस्तकात ऐकायला मिळतात. ऐका - जे . कृष्णमूर्ती लिखित मराठी कादंबरी ,"पालकांसाठी आणि शिक्षकांसाठी" अनिरुद्ध दडके यांच्या आवाजात.