काळ बदलतो माणसे बदलतात . पण बदलत नाही माणसाच्या मनातील आदिम अंधकार. या कादंबरीची सुरुवात ट्रॉयचे युद्ध जेथे संपते तेथे सुरु होते. ट्रॉयच्या सर्वविनाशक युद्धानंतर विजयी असले तरी कधीही न भरून येणाऱ्या असह्य जखमा व वेदना उरात वावगत परत फिरलेले ग्रीक वीर . अभागी कसाड्रा आणि अंगमेन्मन.... जिच्यासाठी हे युद्ध वीस वर्ष अविरत लढले गेले ती विश्वसुंदरी हेलन आणि मेनलॉस आणि ज्याच्यामुळे संभाव्य विजय मिळाला पण वाट्याशी वंचनाच आल्या तो महावीर आणि महामानव ओडीसियस त्याच्या परतीचा हा विलक्षण प्रवास . मानवी जीवनाला नव्या दृष्टीने पाहायला भाग पाडणारा .
Ilukirjandus ja kirjandus