सु.शी.चा लाडका हिरो , अमर विश्वासाची कोर्ट रूम कादंबरी ..... एखादा कुशल चित्रकार विविध रंगाचे स्ट्रोक कॅनव्हॉसवर चितारत चितारत एक क्षणी एका वेगळ्याच रंगाच्या हलक्याश्या स्ट्रोकने त्या चित्राला जबरदस्त अर्थ मिळवून देतो , तसेच अमर विश्वास वेगवेगळे पैलू मांडत शेवटी एका वेगळ्याच क्लूनं आपल्या अशिलाची फासात अडकलेली मान सोडवतो. उत्कंठा वाढवणारी एक अनोखी कहाणी .. "ऑब्जेक्शन युअर ऑनर ", कृणाल अळवे यांच्या आवाजात.