आम्रपाली नावाची प्रसिद्ध नर्तिका 'शो' करायला जात असताना 'होल्ड अप' केली जाते... 'होल्ड अप' करणारा माणूस तिला फक्त एके ठिकाणी सोडायला सांगतो. ती सोडते आणि विसरूनही जाते. पण त्यानंतर सुरु होतं एक रहस्य- नाट्य. ते आम्रपालीला फाशीपर्यंत पोचवणार का? नक्की काय घडले? या सर्व प्रश्नांची उत्तरं फक्त एक माणूस देऊ शकेल. तो म्हणजे बॅ. अमर विश्वास!!! ऐका सुहास शिरवळकरलिखित सस्पेन्स थ्रिलर कादंबरी 'कायद्याचे हात' कृणाल आळवेसह...