"मंद्र" ही कन्नड लेखक एस एल भैरप्पा यांची एक कादंबरी आहे ज्यासाठी त्यांना सन २०१० साठी सरस्वती सन्मानाने सन्मानित करण्यात आले होते. '"मंद्र" ही भैरप्पा यांची सर्वात प्रसिद्ध कल्पित कादंबऱ्यांपैकी एक आहे. हि कादंबरी साहित्य भंडारा, बलेपेट, बंगळुरू यांनी २००२ मध्ये प्रकाशित केली होती. या पुस्तकात संगीतकार आणि नर्तकांनी वेढलेली कथा आहे. किती तरी वेळानंतर भोसलेचा आवाज ऐकू आला, "कलेच्या क्षेत्रात यांनं आपल्याला स्वर्ग भेटवला ! पण कलाकाराच्या अंतरंगात डोकावलं तर तिथं वेगळंच असतं. का हा विरोधाभास ?" "मलाही हाच प्रश्न अनेकदा छळत असतो !" कुलकर्णी म्हणाले. कला आणि कलाकार यामधील अनाकलनीय नात्याचा परखड शोध...!