शक, हूण, कुशाण यांसारख्या मध्य आशियातील भटक्या टोळ्यांनी भारतावर आक्रमणे केली. ते येथे संघर्ष करत स्थिरस्थावरही झाले. हि कथा आहे कुशाण टोळीची .... जी भटक्या आदिम विपरीत अविरत संघर्षरत राहत भारतात आली. आणि पुढे विशाल साम्राज्य निर्माण करत येथील स्थिर नागर संस्कृतीत मिसळूनही गेली . पण हे संक्रमण इतके सहज नसते. आधीच्या संस्कृतीची नाळ तोडत भटकेपणाच्या अचाट उर्मींना आवरत, नव्या अपरिचित ....... पण हव्याश्या वाटणाऱ्या संस्कृतीत समाविष्ट होताना ज्या मानसिक संघर्षातून जावे लागते, त्याचे विलक्षण चित्रण "कुशाण" या संजय सोनवणी यांच्या कादंबरीत आहे.
Grož. ir negrož. literatūra