देशा-परदेशांत पुलंनी खूप प्रवास केला. या प्रवासादरम्यान माणसं, भाषा, खानपान, संस्कृती, त्या-त्या देशांतली भू-सांस्कृतिक वैशिष्ट्ये त्यांनी टिपली. शिवाय जगाकडे पाहण्याच्या मिश्किल नजरेतून त्यांना आणखी काही मजेशीर गोष्टी गवसल्या. त्यांच्या या प्रवासाच्या, देशाटनाच्या अनुभवांनी त्यांच्यासह रसिकांनाही समृद्ध केलं. ऐकूया, पुलंच्या लेखणीतून साकारलेला हा समृद्ध प्रवासानुभव 'जावे त्यांच्या देशा' प्रसाद ओक यांच्यासह...