युरोप प्रवासाबाबत आता लोकांमध्ये फारशी अपुर्वाई राहिलेली नाही, मात्र त्या काळात पुलंनी केलेला युरोपचा दौरा कसा होता, त्यादरम्यान काय गंमतीजमती घडल्या, पुलंच्या नजरेतला युरोप कसा दिसतो, हे ऐकण्याची उत्सुकता मात्र अजूनही प्रत्येकाला असेल, कारण पुलंचा मिश्किल स्वभाव, निखळ विनोद आणि सभोवार बघण्याची दृष्टी! ऐका आणि अनुभवा 'अपुर्वाई' आस्ताद काळेंसह!