बँकमध्ये नवीन नवीन भरती झालेला कर्मचारी आणि नुकतीच होणार होती महत्त्वाची 'मिटिंग'! प्रपोजल्स, लोन्स सोबत अंतर्गत लफडी! अशा मिटिंगची एक हमखास असणारी खासियत. पायताणांची होणारी वरताण चोरी... अशातच परांजपेची चप्पल जाते चोरीला आणि नाईलाज म्हणून त्याला घालावी लागते दुसर्या व्यक्तीची चप्पल! तर लगेच पुढच्या 'मिटिंग'ची नोटीस येते आणि परांजपेचे धाबे दणाणते. परांजपेची चोरी पकडली जाणार की सापडणार खरा चप्पलचोर? ऐका एक अफलातून विनोदी कथा- 'इथून- तिथून'