जे काम पॅशनमधून केलं जातं, ते काम काम वाटत नाही, असं म्हणतात. कारण ते आवडीनं आणि उत्साहानं केलं जातं. उद्योगाचंही तसंच असतं. जे उद्योग पैशासोबत अपार समाधान देतात, ते उद्योग - त्या त्या उद्योजकाच्या जगण्याचा भाग बनून जातात. सेलिब्रिटी ट्रेनर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या शैलेश परुळेकर यांचा व्यवसायही असाच आहे. अनेक सेलब्रिटींना उत्तम फिटनेस राखण्याकरता त्यांनी मार्गदर्शन केलं आहे. सेलिब्रिटी ट्रेनर बनण्यापर्यंतचा त्यांचा प्रवास कसा झाला, हे जाणून घेण्याची उत्सुकता तुम्हाला असेलच. ऐका 'सेलिब्रिटी ट्रेनर' मिलिंद कुलकर्णी यांच्यासह.