मिठाईची दुकानं आता अक्षरशा गल्लीबोळात दिसतात. त्या दुकानांमध्ये अनेक प्रकारची मिठाई मिळते. पण पारंपरिक घरगुती चवीचे खास मराठी पदार्थ अशा दुकानांमध्ये अभावानेच मिळतात. अशा खास घरगुती चवीच्या पदार्थांचा उद्योग गेली कित्येक वर्ष यशस्वीपणे करणारे आठवले कुटूंब आणि त्यांच्या व्यवसायाची ही कहाणी ऐका मिलिंद कुलकर्णी यांच्यासह.