चंद्रकांत तिवारी, अनेक अर्थाने एक बडं प्रस्थ! राज्यातल्या पाच मोठ्या इन्डस्ट्रिअलिस्टसमध्ये गणना, बडे बडे स्मगलर्स बैठकीतले, त्यांच्या धंद्यात याची छुपी भागिदारी... आणि असा माणूस राजकारणाकडे ओढला गेलेला. सक्रीय राजकारणात महत्त्वाची भूमिका... याच लोकप्रियतेच्या कसानुसार तिवारीला हितशत्रू आणि गुप्तशत्रूही अनेक! एका चुकीच्या कॉलमुळे तो हिटलिस्टवर असणार्या हाय प्रोफाईल व्यक्तींना वाचवतो आणि तीन दहशतवादी संघटना त्याच्या पाठीमागे जीवानिशी लागतात... त्याचा एकुलता एक भरवसा म्हणजे त्याचा अंगरक्षक... 'पौरुष'... पौरुष तिवारीचे संरक्षण करू शकेल की तोच हल्ल्याला बळी पडेल? सु.शिं.च्या थरारक कथेत... ऐका- 'अखेरच्या क्षणी'.