उद्दाम हुसेन आणि आखाती युद्धाच्या निमित्ताने आंतरराष्ट्रीय राजकारण्यांच्या , विध्वंसक , स्वार्थी मानवी मनाच्या धांदोट्या उडवणारी हि विलक्षण उपहासकथा . आंतरराष्ट्रीय परिशदेसाठी पृथ्वीवासीयांना निमंत्रित करायला अतिप्रगत मातालियो ग्रहवासी येतात आणि मग पृथ्वीतलावर मानवी विकृतीचा जो विस्फोट होतो त्याचे विदारक दर्शन या कादंबरीत आहे. आभाळात गेलेली माणसं ! - लेखक - संजय सोनवणी , ऐका , स्टोरीटेलवर -सचिन सुरेश यांच्या आवाजात.