नवीन Google Fit सह अधिक निरोगी आणि सक्रिय जीवन जगा!
तुम्ही निरोगी रहावे, यासाठी किती आणि कोणत्या प्रकारची ॲक्टिव्हिटी आवश्यक आहे हे जाणून घेणे कठीण आहे. म्हणूनच तुमच्या आरोग्यामध्ये सुधारणा करण्यात मदत व्हावी, यासाठी तुम्हाला कार्डिओ पॉइंट हे ॲक्टिव्हिटी ध्येय देण्याकरिता Google Fit ने जागतिक आरोग्य संघटना (WHO) आणि अमेरिकन हार्ट असोसिएशन (AHA) यांच्यासोबत सहयोग केला आहे.
तुमच्या हृदयाची स्पंदने वाढवणाऱ्या ॲक्टिव्हिटी या तुमच्या हृदय आणि मनाच्या आरोग्यासाठी अतिशय फायदेशीर असतात. तुमच्या कुत्र्यासोबत चालताना गती वाढवण्यासारख्या प्रत्येक मिनिटाच्या मध्यम ॲक्टिव्हिटीसाठी तुम्हाला एक कार्डिओ पॉइंट मिळेल आणि धावण्यासारख्या आणखी कष्टाच्या ॲक्टिव्हिटीसाठी दुप्पट पॉइंट मिळतील. हृदयविकाराचा धोका कमी करण्यासाठी, झोपेच्या गुणवत्तेमध्ये आणि एकंदर मानसिक स्वास्थ्यामध्ये सुधारणा करण्यासाठी AHA व WHO यांनी शिफारस केलेल्या शारीरिक ॲक्टिव्हिटीचे प्रमाण गाठण्याकरिता आठवड्यातून पाच दिवस फक्त ३० मिनिटे जलद चालणे आवश्यक आहे.
Google Fit तुम्हाला पुढील गोष्टींमध्येदेखील मदत करेल:
तुमच्या फोन किंवा घड्याळावरून तुमच्या व्यायामाचा माग ठेवणे
तुम्ही व्यायाम करता, तेव्हा झटपट इनसाइट मिळवा आणि तुमचे धावणे, चालणे व सायकल चालवणे यांची रीअल-टाइम आकडेवारी पहा. तुमची गती, मार्ग आणि आणखी बऱ्याच गोष्टी रेकॉर्ड करण्यासाठी Fit तुमच्या Android फोनचे सेन्सर किंवा Wear OS by Google स्मार्टवॉचचे हार्ट रेट सेन्सर वापरेल.
तुमच्या ध्येयांवर लक्ष ठेवणे
तुमचे कार्डिओ पॉइंट आणि पावले यांचे ध्येय यांसंबंधित तुमची दैनिक प्रगती पहा. तुमची ध्येये नेहमी गाठता का? हृदय आणि मन निरोगी राखण्यासाठी स्वतःला आव्हान देत राहण्याकरिता तुमची ध्येये सहजपणे ॲडजस्ट करा.
तुमची प्रत्येक हालचाल मोजणे
तुम्ही दिवसभरात चालत, धावत किंवा सायकल चालवत असल्यास, तुमच्या प्रत्येक हालचालीसाठी तुम्हाला क्रेडिट मिळत असल्याची खात्री करण्याकरिता, तुमचा Android फोन अथवा Wear OS by Google स्मार्टवॉच तुमच्या ॲक्टिव्हिटी आपोआप डिटेक्ट करेल आणि तुमच्या Google Fit जर्नलमध्ये जोडेल. अतिरिक्त क्रेडिट हवे आहे का? विशिष्ट गतीने चालण्याचा व्यायाम सुरू करून आणि तालावर पावले टाकून तुमच्या चालण्याची गती वाढवा. वेगळ्या प्रकारचा व्यायाम करायला आवडतो का? पिलाटीज, रोइंग किंवा स्पिनिंग यांसारख्या ॲक्टिव्हिटीच्या सूचीमधून तो निवडा आणि Google Fit तुम्ही मिळवलेल्या सर्व कार्डिओ पॉइंट चा माग ठेवेल.
तुमच्या आवडत्या ॲप्स आणि डिव्हाइसशी कनेक्ट करणे
तुम्हाला तुमच्या आरोग्याचे सकल दृश्य मिळावे, यासाठी Fit तुमच्या आवडीच्या अनेक ॲप्स आणि डिव्हाइसवरील माहिती दाखवू शकते, ज्यामुळे तुम्हाला तुमच्या प्रगतीचा माग कायम ठेवता येईल. यामध्ये Lifesum, Wear OS by Google, Nike+, Runkeeper, Strava, MyFitnessPal, Basis, Sleep as Android, Withings, Xiaomi Mi बँड आणि आणखी बरेच काही समाविष्ट आहे.
कधीही, कुठूनही पाहणे
पुन्हा डिझाइन केलेल्या जर्नलमध्ये Fit आणि तुमच्या इंटिग्रेट केलेल्या ॲप्सवरील तुमच्या ॲक्टिव्हिटी इतिहासाचा स्नॅपशॉट पहा. ब्राउझ करा मध्येदेखील संपूर्ण माहिती मिळवता येईल. इथे तुम्हाला आरोग्य आणि स्वास्थ्यासंबंधित तुमचा सर्व डेटा पाहता येईल.
तुमच्या आरोग्यासंबंधित सर्व पैलूंवर लक्ष ठेवणे
श्वसन हा ताण कमी करण्याच्या आणि थकवा दूर करण्याच्या सर्वात सोप्या मार्गांपैकी एक आहे. Fit सह तुमच्या श्वसनावर लक्ष ठेवणे सोपे आहे—तुम्हाला फक्त तुमच्या फोनच्या कॅमेराची आवश्यकता आहे. तुमचे शारीरिक स्वास्थ्य आणखी चांगल्या प्रकारे समजून घेण्यासाठी तुम्ही तुमच्या श्वसनाच्या रेटप्रमाणेच तुमचा हार्ट रेटदेखील मोजू शकता.
तुमची दिवसभरातील आकडेवारी एका दृष्टिक्षेपात पाहणे
तुमच्या Android फोनच्या होम स्क्रीनवर विजेट जोडा किंवा तुमच्या Wear OS by Google स्मार्टवॉचवर टाइल आणि कॉंप्लिकेशन सेट करा.
येथे Google Fit बद्दल अधिक जाणून घ्या आणि सपोर्ट असलेल्या ॲप्सची सूची पहा: www.google.com/fit
या रोजी अपडेट केले
२३ जाने, २०२५