Google Chrome हे जलद, वापरण्यासाठी सोपे आणि सुरक्षित वेब ब्राउझर आहे. Android साठी डिझाइन केलेले, Chrome तुम्हाला पर्सनलाइझ केलेले बातमीपर लेख, तुमच्या आवडीच्या साइटच्या क्वीक लिंक, डाउनलोड आणि Google शोध व बिल्ड-इन Google भाषांतर देते. तुम्ही सर्व डिव्हाइसवर वापरता त्या तुमच्या आवडत्या Chrome वेब ब्राउझरचा अनुभव घेण्यासाठी आता डाउनलोड करा.
जलदगतीने ब्राउझ करा आणि कमी टाइप करा. तुम्ही टाइप केल्यावर लगेच दिसणार्या पर्सनलाइझ केलेल्या शोध परिणामांमधून निवडा आणि आधी भेट दिलेली पेज झटपट ब्राउझ करा. ऑटोफील सह फॉर्म झटपट भरा.
गुप्त मोड मध्ये ब्राउझ करणे. इतिहास सेव्ह न करता इंटरनेट ब्राउझ करण्यासाठी गुप्त मोड वापरा. तुमच्या सर्व डिव्हाइसवर खाजगीरीत्या ब्राउझ करा.
सर्व डिव्हाइस वर Chrome सिंक करा. तुम्ही Chrome मध्ये साइन इन करता तेव्हा, तुमचे बुकमार्क, पासवर्ड आणि सेटिंग्ज तुमच्या सर्व डिव्हाइसवर आपोआप सिंक केल्या जातील. तुम्ही तुमच्या फोन, टॅबलेट किंवा लॅपटॉप वरील सर्व माहितीला कोणत्याही समस्येशिवाय ॲक्सेस करू शकता.
तुमचा सर्व आवडता आशय आता एका टॅपच्या अंतरावर. Chrome फक्त Google शोध साठी जलद नाही तर, तुमच्यासाठी तयार केले गेले आहे जेणेकरून तुम्ही एका टॅपने तुमचा सर्व आवडता आशय पाहू शकता. तुम्ही तुमच्या आवडत्या बातमी साइट किंवा सोशल मीडियावर थेट नवीन टॅब पेजवरून टॅप करू शकता. Chrome मध्ये "शोधण्यासाठी टॅप करा" वैशिष्ट्य देखील आहे- सर्वाधिक वेबपेजवर असलेले वैशिष्ट्य. तुम्ही दुसऱ्या एखाद्या पेजवर असताना देखील Google शोध सुरू करण्यासाठी कोणत्याही शब्दावर किंवा वाक्यावर टॅप करू शकता.
Google सुरक्षित ब्राउझिंग सह तुमच्या फोनचे संरक्षण करा. Chrome मध्ये Google सुरक्षित ब्राउझिंग बिल्ट-इन आहे. तुम्ही धोकादायक फाइलंवर नेव्हिगेट करण्याचा किंवा धोकादायक फाइल डाउनलोड करण्याचा प्रयत्न करता तेव्हा ते तुम्हाला चेतावण्या दाखवून तुमचा फोन सुरक्षित ठेवते.
जलद डाउनलोड आणि वेब पेज व व्हिडिओ ऑफलाइन पाहा Chrome मध्ये स्वतंत्र डाउनलोड बटण आहे, जेणेकरून तुम्ही फक्त एका टॅपसह व्हिडिओ, इमेज आणि संपूर्ण वेब पेज सहजरीत्या डाउनलोड करू शकता. Chrome मध्ये डाउनलोडसाठी खुद्द Chrome अंतर्गत स्वतंत्र जागा आहे जेथे तुम्ही डाउनलोड केलेला सर्व आशय ऑफलाइन असताना देखील ॲक्सेस करू शकता.
Google व्हॉइस शोध. Chrome तुम्हाला तुम्ही ज्याच्याशी बोलू शकता असा प्रत्यक्ष वेब ब्राउझर देते. फिरतीवर असताना टाइप न करता उत्तरे शोधण्यासाठी तुमचा आवाज वापरा आणि हँड्स फ्री प्रवास करा तुम्ही तुमचा आवाज वापरून कधीही आणि कुठेही आणखी झटपट ब्राउझ आणि नेव्हिगेट करू शकता.
Google भाषांतर बिल्ट-इन: संपूर्ण वेब पेजचे झटपट भाषांतर करा. एका टॅपसह संपूर्ण वेबचे तुमच्या स्वतःच्या भाषेत भाषांतर करण्यासाठी Chrome मध्ये Google भाषांतर बिल्ट इन आहे.
पर्सनलाइझ केलेल्या स्मार्ट शिफारशी. Chrome तुमच्या स्वारस्यांना साजेसा अनुभव तयार करते. तुम्हाला नवीन टॅब पेजवर Chrome ने तुमच्या पूर्वीच्या ब्राउझिंग इतिहासावर आधारित निवडलेले लेख दिसतील.
या रोजी अपडेट केले
२२ जाने, २०२५