तत्वद्यानाचा मार्ग सोडून कादंबरी लेखनातून जीवनाचा अर्थ जणू पाहणाऱ्या लेखकाची- डॉ.एस .एल.भैरप्पा यांची अत्यंत लोकप्रिय आशय संपन कादंबरी 'वंश रुक्ष '.सनातन धर्म परंपरा आणि मन्वंतर काळातील बदलती जीवन मुल्ये यातील संघर्षाचे कौटुंबिक पातळीवर उमटवणारे भाव किल्लोळ प्रभावीपणे चित्रित करणारी कलाकृती. मुळ कन्नड कादंबरीला कर्नाटक साहित्य अकादमीचा पुरस्कार मिळाला आहे.तर या कादंबरीतील कन्नड चित्रपटाला राष्ट्रीय पुरस्कार लाभला आहे.साहित्य अकादमीने अनुवादासाठी पुरस्कार देण्याची योजना आखल्यानंतर मराठीत सर्वप्रथम हा मान या अनुवादाला मिळाला आहे.त्याचबरोबर मिळणारा 'महाराष्ट्र गौरव' हि या अनुवादाने मिळविला आहे. बीज क्षेत्र न्याय आणि वंश रुक्षाची संकल्पना यांचा उहापोह करणारी कलात्मक कादंबरी.